आयपीएल सुरु होण्यापूर्वीच संघांना एकामागून एक धक्के बसत आहेत. कारण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच आयपीएलच्या संघांमधून खेळाडू माघार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखील चेन्नई सुपर किंग्सला धक्के बसले होते. पण आता विराट कोहलीच्या आरसीबी संघालाही धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण संघातील एका खेळाडूने स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच माघार घेतल्याचे म्हटले जात आहे.

सध्याच्या घडीला जगभरात करोनाचे वातावरण आहे आणि त्यामुळे लोकं भयभीतही झालेली आहेत. हेच कारण ठरले ते चेन्नईच्या संघातील सुरेश रैनाच्या माघार घेण्याचे, कारण चेन्नईच्या संघातील १३ सदस्य एकाच दिवशी करोना पॉझिटीव्ह सापडले आणि त्यानंतर रैनाने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आरसीबीच्या संघातील एका स्टार खेळाडूने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबीच्या संघातील वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने आयपीएलला सोडचिठ्ठी दिली आहे. आयपीएलमधून माघार घेताना केनने वैयक्तिक कारण पुढे केले आहे. केन हा बाबा होणार असल्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केनऐवजी आम्ही संघात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाला संधी दिली आहे.

सध्याच्या घडीला आयपीएलला करोनाचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकिकडे आयपीएलमधील संघांचे सदस्य करोना सापडत आहेत. दुसरीकडे काही खेळाडू स्पर्धेपूर्वीच माघार घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने अजूनही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले पाहायला मिळत नाही. आता चेन्नईच्या संघातील सदस्य करोना निगेटीव्ह सापडलेले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करू शकते, असे वाटत आहे.

शुक्रवारी चेन्नईच्या संघातील एका खेळाडूसह १२ सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना करोना झाला होता. हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर चेन्नईच्या संघात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सर्व खेळाडू स्वतंत्रपणे आपल्या रुममध्ये असले तरी त्यांना करोनाबाबतची चिंता सतावत होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चेन्नईचा एक खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला होता. शनिवारीच घाबरलेल्या सुरेश रैनाने चेन्नईचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि तो मायदेश परतला होता. त्यामुळे संघाचे टेंशन अजूनच वाढलेले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here