म.टा.प्रतिनिधी, नाशिक
इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेलेले शेखर गवळी हे महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचा-

शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना २५० फूट दरीत कोसळले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा शोध लागू शकला नाही. या बाबत आपत्कालीन यंत्रणेने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु संध्याकाळ पर्यंत शोध लागू शकला नाही.

वाचा-

अंधार पडल्याने व दरीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने स्थानिक प्रशासनाने शोध कार्य थांबवले आहे. ही घटना संध्याकाळी ५.३० च्या सुमारास घडली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या बाबत उद्या सकाळी मदत कार्य पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here