वाचा-
विराटने सोशल मीडियावर जेव्हा ही बातमी शेअर केली तेव्हा फक्त पहिल्या ३ तासात त्याच्या पोस्टला ३ लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले होते. तर ३४ हजार लोकांनी रिट्वीट केले. विराटच्या पोस्टवर २० हजार लोकांनी कमेंट केली होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला काय झाले?
कोहली कुटुंबात नवा पाहूणा येणार या बातमीवर आजी-माजी क्रिकेटपटू, सामान्य चाहते ते बीसीसीआय आणि आयसीसीने शुभेच्छा दिल्या होत्या. पण या बातमीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कदाचित काही से निराश केले आहे. ‘द कोरियर मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार विराटने दिलेल्या या गुड न्यूजवर त्याच्या क्रिकेट कार्यक्रमाबद्दल काळजीत आहे.
वाचा –
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला काळजी वाटते की, जेव्हा विराट बाप होईल तेव्हा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आहे. जर विराट सारखा मोठा खेळाडू या दौऱ्यातील काही सामने मिस केला तर ही गोष्टी त्याच्या दृष्टीने काळजीची आहे.
३०० मिलियन डॉलरची कमाई
करोना व्हायरसमुळे मैदानावर प्रेक्षकांना बंदी आहे. त्यामुळे भारत दौऱ्यात टीव्ही प्रेक्षकांच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी आहे. एका रिपोर्टनुसार भारताच्या या दौऱ्यातून ऑस्ट्रेलियाला जवळपास ३०० मिलियन डॉलर कमाई करण्याची संधी आहे. जर विराट सारखा खेळाडू या दौऱ्यातील काही सामने मिस करणार असेल तर ऑस्ट्रेल्याच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.
भारतीय चाहते भडकले
जेव्हा भारती चाहत्यांपर्यंत ही बातमी आली तेव्हा सोशल मीडियावर त्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने म्हटले की, हा प्रकार खुप वाईट आहे. या वेळी विराट आणि त्याच्या पत्नीसाठी आनंदी होण्याची वेळ आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही आर्थिक गोष्टीचा विचार करू नये. ही गोष्टी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कसा प्रभावित करेल.
दुसऱ्या एका चाहत्याने आठवण करून दिली की जेव्हा विराटच्या वडीलांचे निधन झाले होते तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.
करोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिकेट बोर्डाचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात अधिकतर क्रिकेट सामने रद्द झालेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या काळात मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक संकट इतके वाढले की त्यांना कर्मचारी कमी करावे लागले होते. त्यामुळे भारताच्या दौऱ्याकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठी आशा आहे. विराट शिवाय जर टीम इंडिया मैदानात उतरली तर प्रायोजक मोठी रक्कम देणार नाहीत, असे त्यांना वाटते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thanks so much for the blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.