नवी दिल्ली: आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज () संघाचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार () ने अचानक स्पर्धा सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैनाने वैयक्तीक कारणामुळे या वर्षी न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रथम समोर आले होते. नंतर संघातील १३ जणांना करोना झाला आणि त्याच बरोबर हॉटल रूमवरून झालेल्या वादामुळे तो भारतात परतल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच चेन्नईचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष यांचे त्याच्या यश डोक्यात गेल्याचे वाक्याने रैना बद्दल चर्चा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. या सर्व घटनेवर त्याने आता स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा-
रैना अचानक भारतात परतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच श्रीनिवासन यांचे वक्तव्याने भर पडली होती. रैना यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसेल पण तो चेन्नईकडून खेळणार नाही असे देखील बोलले गेले. पण या सर्व बातम्यांवर बोलताना रैना म्हणाला, माझ्यात आणि सीएसकेमध्ये कोणताही वाद नाही. तसेच एन श्रीनिवासन यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, एका वडीलांना मुलाला बोलण्याचा आणि रागावण्याचा अधिकार असतो.

वाचा-
मी पत्नी आणि मुलांच्या काळजी पोटी भारतात आलो आहे. इतकच नव्हे तर मी अजून देखील आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी खेळू शकतो, असे रैनाने स्पष्ट केले.

भारतात परतण्याचा माझा वैयक्तीक निर्णय होता. मी माझ्या कुटुंबियांसाठी परत आलो आहे. अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे मला कुटुंबासोबत राहणे गरजेचे होते. देखील माझे कुटुंब आहे आणि माही (महेंद्र सिंह ) माझ्यासाठी सर्व काही आहे. असा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण आहे. पण तो मला घ्यावा लागला. माझ्यात आणि सीएसकेमध्ये कोणताही वाद नाही. कोणत्याही ठोस कारणांशिवाय मी साडे बारा कोटी रुपये सोडणार नाही. मी भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अजून युवा आहे आणि ४ ते ५ वर्ष आयपीएल खेळू शकतो, असे रैनाने सांगितले.

वाचा-
रैनाच्या अचानक भारतात येण्यावरून श्रीनिवासन बरेच काही बोलले होते. त्यावर विचारले असता तो म्हणाला, ते माझ्यासाठी वडीलांसारखे आहेत. नेहमी माझ्या पाठिशी उभे राहतात. मला छोट्या मुलासारखी वागणूक देतात. एक बाप आपल्या मुलाला ओरडू शकतो. त्यांना माहिती नव्हते की मी आयपीएल सोडून भारतात का आलो. आता त्यांना कारण कळाले आहे आणि आमचे बोलणे देखील झाले आहे. भारतात परतल्यानंतर मी क्वारंटाइन होऊन देखील ट्रेनिंग करत आहे. तुम्हाल कल्पना नाही की, मी पुन्हा आयपीएलच्या सराव सत्रात दिसू शकेन.

वाचा-
माझे कुटुंब आहे आणि त्याबाबत मला काळजी आहे. मला काही झाले तर त्यांचे काय होणार? माझे कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे. सध्या मी त्यांच्यासाठी काळजीत आहे. मी भारतात आल्यानंतर मुलांना पाहिले नाही. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सर्वांची काळजी घेत असल्याचे त्याने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here