शुक्रवारी चेन्नईच्या संघातील १३ सदस्य करोना पॉझिटीव्ह सापडले आणि त्यानंतर रैना घाबरला. आपल्या मनातील भिती त्याने धोनी आणि संघातील अन्य काही व्यक्तींनाही बोलून दाखवली. त्यावेळी धोनीने रैनाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण रैनाने त्याचे काहीच ऐकले नाही. त्यानंतर धोनी आणि रैना यांच्यामध्ये भांडण झाल्याचे म्हटले गेले होते. पण याबाबतचा खुलासा आज रैनानेच केल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत रैना म्हणाला की, ” भारतात परतण्याचा माझा वैयक्तीक निर्णय होता. मी माझ्या कुटुंबियांसाठी परत आलो आहे. अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे मला कुटुंबासोबत राहणे गरजेचे होते. सीएसके देखील माझे कुटुंब आहे आणि माही (महेंद्र सिंह धोनी) माझ्यासाठी सर्व काही आहे. असा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण आहे. पण तो मला घ्यावा लागला.”
रैनाने पुढे सांगितले की, ” माझ्यात आणि सीएसकेमध्ये कोणताही वाद नाही. त्याचबरोबर भारतात परतताना माझ्या आणि धोनीमध्ये भांडण झाले, असेही ऐकिवात येत होते. पण या गोष्टीमध्ये सत्य नाही. माझ्या आणि धोनीमध्ये कोणताही वाद नाही. मी भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अजून युवा आहे आणि ४ ते ५ वर्ष आयपीएल खेळू शकतो, असे रैनाने दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.”
वाचा-
रैनाने भारतात येण्यामागचे कारण यावेळी स्पष्ट केले. रैना म्हणाला की, ” माझे कुटुंब आहे आणि त्याबाबत मला काळजी आहे. मला काही झाले तर त्यांचे काय होणार? माझे कुटुंब माझ्यासाठी सर्व काही आहे. सध्या मी त्यांच्यासाठी काळजीत आहे. मी भारतात आल्यानंतर मुलांना पाहिले नाही. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन सर्वांची काळजी घेत असल्याचे त्याने सांगितले.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
Thanks so much for the blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.