>> राहुल द्रवीडने वयाच्या १२व्या वर्षी खेळण्यास सुरुवात केली. एका मराठी घरात जन्मलेल्या राहुल बेंगळुरूमध्ये मोठा झाला. त्याने १५ वर्षाखालील, १७ वर्षाखालील आणि १९ वर्षाखालील कर्नाटकच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. ३ एप्रिल १९९६ रोजी द्रवीडने भारतीय संघाकडून वनडे तर त्याच वर्षी २० जून रोजी कसोटीत पदार्पण केले.
वाचा-
>> भारत सरकारने राहुल द्रवीडला पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत द्रवीड चौथ्या क्रमांकावर आहे. कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम द्रवीडच्या नावावर आहे. १६ वर्षाच्या करिअरमध्ये द्रवीडने ३१ हजार २५८ चेंडू खेळले आहेत. तर ७३६ तास त्याने बॅटिंग केली असून हा एक जागतिक विक्रम आहे.
>> कोणत्याही संघाविरुद्ध आणि प्रतिकूल परिस्थितीत धावा करण्याचे द्रवीडचे सर्वात खास असे वैशिष्ट होते. द्रवीड जगातील असा पहिला फलंदाज ठरला होता, ज्याने कसोटी खेळणाऱ्या सर्व संघांविरुद्ध शतक झळकावले.
>> कसोटी सामन्यात सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले की द्रवीड द वॉल म्हणू्न खेळपट्टीवर थांबायचा. एका बाजूला द्रवीड संयमी खेळी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असल्याचे अनेक वेळा घडले आहे.
वाचा-
>> कसोटी क्रिकेटमध्ये क्रमांक तीनवर खेळत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम द्रवीडच्या नावावर आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर ५२च्या सरासरीने १० हजार ५२४ धावा केल्या आहेत.
>> भारतीय संघातील खेळाडू द्रवीडला जॅमी म्हणून हाक मारतात. द्रवीड फक्त स्वत: मोठ्या धावा करत नाही तर मोठी भागीदारी करण्यात देखील त्याच वाटा असायचा. ३२ हजार ०३९ धावांची भागिदारी करण्याचा विक्रम द्रवीडच्या नावावर आहे. त्याने ५०हून अधिक धावांची १२५ वेळा तर १००हून अधिक धावांची ८८ वेळा भागिदारी केली आहे.
>> फील्डर म्हणून १६४ कसोटीत त्याने २१०हून अधिक कॅच पकडले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
>> कसोटी क्रिकेटमध्ये द्रवीड एकदाही ‘गोल्डन डक’वर बाद झाला नाही. आयसीसीने २००४मध्ये त्याला ‘प्लेअर ऑफ द इयर’ आणि ‘टेस्ट प्लेअर ऑफ द इअर’ हा सन्मान दिला होता.
वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News
Everything is very open and very clear explanation of issues. was truly information. Casibom Resmi Adresimiz için Tıklayin. ! casibom
Hi just want say that this article is very nice and very informative article.I will make sure to be reading your blog more.
Ok Sports