घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच… घरातील फक्त वडिल कमावतात आणि पाच जणांच्या कुटुंबियांचा गाडा हाकतात. पण परिस्थिती कशीही असली तरी डोळ्या स्वप्न मात्र भारताचे नाव उंचावण्याचे. आतापर्यंत खेलो इंडिया स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदकं पटकावली आहेत. पण सध्याच्या घडीला ती झोपडीच्या तालमीत सराव करत आहे. ही गोष्ट जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांना समजली तेव्हा ते तिच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तिचा सर्व खर्च आता रोहित उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही युवा कुस्तीपटू आहे सोनाली कोंडिबा मंडलिक.

वाचा-

अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी गावात सोनाली राहते. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. पण आपल्या मुलीने कुस्तीमध्ये भारताचे नेतृत्व करावे आणि देशाचे नाव उंचवावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. त्यामुळे स्वत:साठी घर नसतानाही त्यांनी गोठ्यात राहून सोनालीची तयारी सुरुच ठेवली आहे. एका झोपडीच्या तालमीत सध्या सोनाली सराव करत आहे.

वाचा-

सोनालीमध्ये चांगली गुणवत्ता आहे. पण तिला जर आर्थिक पाठबळ मिळाले तर ती गगनभरारी घेऊ शकते, भारताचे प्रतिनिधीत्व करून देशाला पदक जिंकवून देऊ शकते. याबाबतचे एक आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता सोनालीसाठी कुस्तीला लागेल तो खर्च रोहित पवार करणार आहेत.

सोनालीला जेव्हा आर्थिक मदतीची गरज आहे, हे कळल्यावर रोहित पवार पुढे आले आणि त्यांनी तिला दत्तक घेतले आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, ” सोनालीने खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशाचा मला अभिमान आहे. तिच्याशी, तिचे पालक आणि वस्ताद यांच्याशी माझं बोलणंही झालं. या भगिनीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारलीय. यशाची अशी अनेक शिखरं ती सर करेल, असा मला विश्वास आहे.”

वाचा-

सोनाली फक्त कुस्तीच खेळत नाही तर ती शिक्षणही घेत आहे. कर्जत येथील महाविद्यालयात ती १२ मध्ये शिकत आहे. सोनालीला आर्थिक मदत मिळाली की ती देशाकडूनही खेळू शकते, हे समजल्यावर रोहित पवार यांनी तिची मदत केली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here