सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्सचा महत्वाचा फलंदाज आहे, असे म्हटले जाते. त्यामुळेच चेन्नईच्या संघातील फलंदाजीचे तिसरे स्थान नेहमीच रैनाला दिले जायचे. पण आता रैना यावर्षी आयपीएल खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ चिंतेत असेल, असे तुम्हाला वाटत असेल, पण तसे नक्कीच नाही. कारण रैना जर आयपीएल खेळणार नसेल तर चेन्नईचे काहीच बिघडणार नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कर्णधार महेंद्रसिंग धोनीपुढे रैनाच्या जागेसाठी बरेच पर्यंय उपलब्ध असल्याचे पाहिले जात आहे.

सध्याच्या घडीला रैना सोडून गेल्यावर चेन्नईच्या संघात काही बदल होऊ शकतात. मुरली विजय आणि शेन वॉटसन ही चेन्नईची सलामीची जोडी असेल. पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रैनाच्या जागी कोणाला खेळवायचे, याचे बरेच पर्याय धोनीसमोर खुले आहेत. कारण धोनी आता ३-४ फलंदाजांना तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आणू शकतो, असे म्हटले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यू प्लेसिस हा धोनीसाठी पहिला पर्याय असेल. आतापर्यंत फॅफने धडाकेबाज फलंदाजी करत आपली संघातील जागा कायम ठेवली आहे. त्यामुळे जर रैना संघात नसेल तर धोनीसाठी फॅफ हा तिसऱ्या क्रमांकासाठी सर्वांत चांगला पर्याय असेल, असे म्हटले जात आहे.

वाचा-

भारताचे तीन फलंदाज चेन्नईच्या संघातील तिसऱ्या स्थानावर खेळायला येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. अंबाती रायुडू हादेखील रैनाच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. यापूर्वीही रायुडूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही गोष्ट नक्कीच नवीन नसेल. रायुडूबरोबर केदार जाधव हादेखील तिसऱ्या क्रमांकासाठी धोनीपुढे चांगला पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. कारण केदार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ डावाला चांगला आकार देऊ शकतो, असे म्हटले जाते. रायुडू आणि केदारबरोबर महाराष्ट्राचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा तिसऱ्या स्थानासाठीचा शिलेदार असू शकतो, असेही म्हटले जात आहे. ऋतुराजने आतापर्यंत स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याची फलंदाजी जास्त खेळाडूंना माहिती नसेल, त्यामुळे ऋतुराज हा या आयपीएलमधील सरप्राइज पॅकेज ठरू शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here