आयपीएल खेळायला युएईमध्ये गेलेल्या सर्व खेळाडूंसाठी खास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्व खेळाडूंसाठी बायो-बबल सुरक्षाकवच ठेवण्यात आले आहे. पण त्यासाठी काही नियम करण्यात आलेले आहेत. पण हे सारे नियम मोडत आयपीएलच्या खेळाडूंनी समुद्र किनारी पार्टी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या खेळाडूंचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

एकिकडे चेन्नई सुपर किंग्स संघातील १४ व्यक्ती या करोनाबाधित झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने, आपण इथे मजा करण्यासाठी नाही तर आयपीएल खेळण्यासाठी आलो आहोत, असे सर्वांना सांगितले होते. पण कोहलीने ही गंभीर बाब सांगितल्यानंतर काही तासांतच आयपीएलचे खेळाडू समुद्र किनारी पार्टी करत असल्याचे पाहिले गेले.

आयपीए खेळण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जर कोणता संघ पहिला पोहोचला असेल तर तो होता किंग्ज इलेव्हन पंजाब. युएईला पोहोचल्यावर पंजाबच्या संघातील सर्व सदस्यांची तीनवेळा करोना चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडू करोना निगेटीव्ह असल्याचे समजल्यावर पंजाबच्या संघाने सरावाला सुरुवात केली. आता तर पंजाबचे क्रिकेटपटू समुद्रकिनारी मजा-मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले.

वाचा-

पंजाबचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक एका खासगी समुद्र किनाऱ्यावर गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काही संघातील खेळाडूंनी व्यायाम केला तर काही जणं मजा-मस्ती करण्यात मश्गुल होते. करोनाचे संकट असताना पंजाबच्या खेळाडंनी समुद्र किनारी जाऊन, अशी पार्टी करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.

वाचा-

किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या ट्विटरवर एक हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर पंजाबचा संघा टीकेचा धनी ठरत आहे. कारण आयपीएलमधील काही जणांना करोना झालेला असताना पंजाबच्या खेळाडूंनी अशी समुद्रकिनारी एकत्रितपणे जाऊ पार्टी करणे कितपत योग्य आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीसीसीआयला याबाबत जर कोणी तक्रार केली तर पंजाबच्या संघावर कारवाई होऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here