वाचा-
वाचा-
बुधवारी मलिंगाने ही माहिती दिली. या वर्षी मी मुंबई संघाकडून खेळण्यास उपलब्ध नसेन असे त्याने सांगितले. मलिंगाच्या बदली ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिंसनला संघात स्थान देण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने जेम्सचे स्वागत केले आहे आणि मलिंगाच्या निर्णयाचे समर्थन केलय. जेम्स आमच्यासाठी अगदी योग्य खेळाडू आहे. तो संघात आल्यामुळे गोलंदाजीचा बाजू आणखी मजबूत होईल.
वाचा-
मलिंगा हा संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पण सध्याच्या परिस्थितीत त्याला त्याच्या कुटुंबासोबत थांबायचे आहे.
मलिंगा आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने मुंबईकडून १७० विकेट घेतल्या आहेत. गेल्या हंगामात त्याने शानदार कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. मलिंगाने चौथ्या वेळा मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यास मदत केली होती. शेवटच्या चेंडूवर चेन्नई संघाला दोन धावांची गरज असताना मलिंगाने शार्दुल ठाकूरला LBW करत विजेतेपद मिळून दिले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times