वाचा-
यापूर्वी बबिताने भाजपाच्या बाजूने बरेच ट्विट केल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रतिस्पर्धी पक्षाला बबिताने आतापर्यंत चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बबिताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. त्याचबरोबर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतरही बबिताने बॉलीवूडमधील करणे जोहरवर जहरी टीका केली होती. आता बबिताने राष्ट्रीय पुरस्काराच्या नावावर आपला आक्षेप नोंदवला आहे.
वाचा-
राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळीही बबिताने आपला आक्षेप नोंदवला होता. यावेळी बबिताने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये बबिताने म्हटले होते की, ” राजीव गांधी यांनी भारतात उभं राहून थेट इटलीमध्ये भाला फेकला होता आणि त्यामळेच त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला जातो का…”
आज पुन्हा एकदा बबिताने हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. आज पुन्हा एकदा ट्विट करत बबिताने म्हटले आहे की, ” खेळाशी संबंधित असलेले सर्व पुरस्कार हे फक्त आणि फक्त महान आणि नामांकित खेळाडूंच्या नावावर असायला हवेत. खेळाशी निगडीत पुरस्कार राजकारणी व्यक्तीच्या नावाने असू नयेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलायला हवे आणि त्याजागी एका महान खेळाडूचे नाव द्यायला हवे, हा पर्याय तुम्हाला कसा वाटतो…”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times