वाचा-
या वर्षी आयपीएल न खेळता पुन्हा भारतात परत येण्याच्या सुरेश रैनाच्या निर्णयावर श्रीनिवासन म्हणाले होते की, “रैनाच्या डोक्यात यश गेले आहे. रैनाच्या आयपीएल सोडण्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यापैकी एक म्हणजे संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाल्याने तो घाबरला होता आणि त्यामुळेच त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरे कारण म्हणजे रैनाला हॉटेलमधील रुम खराब मिळाली होती.”
वाचा-
श्रीनिवासन यांच्या या वक्तव्यानंतर रैना चांगलाच नरमलेला पाहायला मिळाला. त्यानंतर आज बुधवारी रैना म्हणाला की, ” भारतात परतण्याचा माझा वैयक्तीक निर्णय होता. मी माझ्या कुटुंबियांसाठी परत आलो आहे. अशा काही गोष्टी होत्या ज्यामुळे मला कुटुंबासोबत राहणे गरजेचे होते. सीएसके देखील माझे कुटुंब आहे आणि माही (महेंद्र सिंह धोनी) माझ्यासाठी सर्व काही आहे. असा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण आहे. पण तो मला घ्यावा लागला. माझ्यात आणि सीएसकेमध्ये कोणताही वाद नाही. त्याचबरोबर भारतात परतताना माझ्या आणि धोनीमध्ये भांडण झाले, असेही ऐकिवात येत होते. पण या गोष्टीमध्ये सत्य नाही. माझ्या आणि धोनीमध्ये कोणताही वाद नाही, असे रैनाने दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते. ”
वाचा-
रैनाला पुन्हा चेन्नईच्या संघात स्थान देणार की नाही, याबाबत विचारले असता श्रीनिवासन म्हणाले की, ” रैना हा माझ्या मुलासारखा आहे. इंडिय सिमेंट ही माझी कंपनी क्रिकेटबरोबर १९६० सालापासून संलग्न आहे. आम्ही कधीही चेन्नई संघाच्या क्रिकेटशी निगडीत गोष्टींमध्ये नाक खुपसले नाही, त्यामुळेच संघाला एवढे यश मिळू शकले, असे मला वाटते. इंडिया सिमेंट्सने चेन्नईचा संघ विकत घेतला आहे, खेळाडू नाही. त्यामुळे जर रैनाला पुन्हा संघात घ्यायचे असेल तर ते माझ्यावर नक्कीच अवलंबून नाही. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संघ व्यवस्थापन रैनाबाबतचा निर्णय घेतील आणि मला तो मान्य असेल.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times