वाचा-
भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हा १३वा विजय ठरला. या विजयासह भारताने पाकिस्तानसह जगभरातील सर्व संघांना मागे टाकत नवा विक्रम केला. भारताने श्रीलंकेविरुद्ध १९ सामन्यात १३ विजय मिळवले आहेत. टी-२०मध्ये एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या यादीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. पण ते १३ विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला २१ सामने खेळावे लागले होते. भारताने १९ सामन्यात १३ विजय मिळवत पाकिस्तानला मागे टाकले.
वाचा-
आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असेलल्या पाकिस्तानने श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या विरुद्ध प्रत्येकी २१ सामन्यात १३ विजय मिळवले आहेत.
वाचा-
भारताशिवाय इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध १३ विजय मिळवले आहेत. पण त्यासाठी त्यांनी २१ सामने खेळावे लागले. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या १५ पैकी १२ सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानने २३ टी-२० सामन्यापैकी १२ वेळा ऑस्ट्रेलियाला हरवले आहे.
टी-२०मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
१] भारत- श्रीलंका विरुद्ध १९ सामन्यात १३ विजय
२] पाकिस्तान- न्यूझीलंड आणि श्रीलंकाविरुद्ध २१ सामन्यात प्रत्येकी १३ विजय
३] इंग्लंड- न्यूझीलंडविरुद्ध २१ सामन्यात १३ विजय
४] अफगाणिस्तान- आयर्लंडविरुद्ध १५ सामन्यात १२ विजय
५] पाकिस्तान- ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ सामन्यात १२ विजय
हे देखील वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News