दुबई: (IPL) च्या १३व्या हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात कडून जोरदार तयारी सुरू आहे. पण अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेत अनेक अडचणी येत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघातील १३ जणांना त्यानंतर प्रसारण करणाऱ्या स्टारच्या पथकातील एकाला करोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयला आणखी एक शॉक बसला आहे.

वाचा-
दुबईत आयपीएलच्या तयारीची देखरेख करण्यासाठी आलेल्या बीसीसीआयशी संबंधिक एका सदस्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या वर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलचा घाट घातला गेला आहे.

वाचा-
आयपीएलशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. बीसीसीआयच्या पथकातील एका सदस्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण हा सदस्य क्रिकेट संचालक संघाशी संबंधित आहे की आरोग्य पथकाशी संबंधित हे सांगू शकत नाही. अन्य सदस्य ठिक असून त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

वाचा-
काळजी करण्याची परिस्थिती नाही. चेन्नई संघातील १३ जणांना करोना झाला होता. आता ते सर्व जण १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये गेले आहेत. अन्य संघातील सदस्यांची चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतर त्यांचा सराव सुरू करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here