बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आता क्रिकेटपटू रोहित शर्माचेही नाव घेतले जात आहे. कारण सीबीआयने आज रोहित शर्माच्या जवळच्या व्यक्तीचीही चौकशी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितच्या जवळची व्यक्ती आहे तरी कोण आणि त्या व्यक्तीचा सुशांतच्या आत्महत्येशी काय संबंध आहे, जाणून घ्या…

वाचा-

सीबीआय मुंबईमध्ये सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान सीबीआयने रोहित शर्माच्या एका जवळच्या व्यक्तीला आज बोलावले होते. या व्यक्तीची कसून चौकशीही करण्यात आली. पण या प्रकरणात रोहित शर्माचे काय कनेक्शन आहे, पाहा…

सध्याच्या घडीला रोहित शर्मा हा आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये गेला आहे. सध्या रोहित आयपीएलचा सराव करण्या व्यस्त आहे. पण दुसरीकडे आज जेव्हा रोहितच्या जवळच्या व्यक्तीची सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी केली गेली तेव्हा बऱ्याच जणांचे डोळे विस्फारले गेले. कोणाचे कुठून कसे संबंध असू शकतात, हे या प्रकरणात आता पुढे येत आहे.

वाचा-

रोहित शर्माचा मेव्हणा बंटी सचदेवची कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट नावाची एक कंपनी आहे. सुशांतची माजी असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन ही या कंपनीमध्ये कामाला होती. दिशा जेव्हा या कंपनीमध्ये कामाला होती तेव्हा ती सुशांतसिंगच्या संपर्कात आली होती. दिशाची आत्महत्या झाल्यानंतर थोड्याच दिवसात सुशांतनेही आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी बंटीला सीबीआयने बोलावले होते.

वाचा-

क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे घनिष्ठ संबंध असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे बऱ्याचदा बॉलीवूडच्या पार्टीमध्ये क्रिकेटपटूही पाहिले जातात. त्याचबरोबर क्रिकेटपटूंबरोबर बॉलीवूडच्या अभिनेत्रींची प्रेमप्रकरणही चांगलीच गाजलेली आहेत. त्यामुळे रोहित शर्माचे नाव आल्यावर याप्रकरणी काही जणांना धक्का बसला नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here