वाचा-
पाकिस्तानचा संघ जेव्हा २०१३ साली भारताच्या दौऱ्यावर आला होता तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले होते. या पहिल्या सामन्यात शमीला प्रथम ९ षटके दिली होती. या ९ षटकांमध्ये शमीने एक बळी मिळवला होता. त्याचबरोबर ९ षटकांमधील चार षटके शमीने निर्धाव टाकली होती. पदार्पणाच्या सामन्यात राच निर्धाव षटके टाकणारा शमी हा क्रिकेट विश्वातील आठवा गोलंदाज होता.
वाचा-
पदार्पणानंतर काही दिवसांतच शमी हा संघाचे मुख्य अस्त्र बनला होता. त्यामुळेच त्याला २०१५ साली झालेल्या विश्वचषकात संधी देण्यात आली होती. या विश्वचषकात शमीने महत्वाची भूमिका बजावली होती. विश्वचषकातील सात सामन्यांमध्ये शमीने १७ बळी मिळवले होते. भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी दुसऱ्या स्थानावर होता. पण या विश्वचषकात खेळताना शमीच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे सामन्यानंतर शमीला चालतानाही त्रास व्हायचा. पण तरीही शमी ही पूर्ण स्पर्धा खेळला होता. डॉक्टर रोज शमीला तीन पेनकिलर द्यायचे आणि त्यानंतर तो मैदानात उतरू शकत होता.
वाचा-
विश्वचषकात हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रमही शमीच्या नावावर आहे. २०१९ साली इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्य विश्वचषकात शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हॅट्रीक घेतली होती. २०१५नंतर झालेल्या २०१९च्या विश्वचषकातही शमीकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. आता शमी युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलची जोरदार तयारी करत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times