येत्या २४ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समिती १५ ऐवजी १६ किंवा १७ जणांची निवड करते का याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताच्या मुख्य संघासोबतच भारताचा अ संघ देखील न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे गरज पडली तर निवड समितीकडे खेळाडूंचा पर्याय असेल.
वाचा-
न्यूझीलंड दौऱ्यानंतर काही महिन्यातच ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळेच निवड समितीचे लक्ष वर्ल्ड कपच्या दृष्टीने खेळाडूंची निवड करण्याकडे असेल. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील संघच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी असण्याची दाट शक्यता आहे. दुखापतीतून बाहेर पडलेल्या हार्दिक पांड्याची संघात निवड होण्याची शक्यता आहे. भारताच्या अ संघात त्याची निवड केली असून तो सध्या न्यूझीलंडमध्ये दोन सामने खेळणार आहे. या दोन सामन्यात हार्दिकला फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे.
वाचा-
भारताच्या अ संघाचा सामना २६ जानेवारी रोजी संपणार आहे. कंबर दुखीच्या त्रासामुळे हार्दिक संघाबाहेर होता. अ संघाचे सामने झाल्यानंतर तो २९ जानेवारीच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताच्या मुख्य संघासाठी उपलब्ध असेल. हार्दिकची संघात निवड होऊ शकते. पण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट आहे का नाही हे पाहावे लागेल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा-
वनडे आणि टी-२० साठीचा संघ एकच असेल की वेगवेगळा हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. वनडे संघातून केदार जाधवला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळू शकते. मुंबईचा सुर्यकुमार यादव याचा पाचव्या किंवा सहाव्या स्थानासाठी विचार केला जाऊ शकतो. सुर्यकुमार आणि संजू सॅमसन दोन्ही भारताच्या अ संघात आहेत. कसोटी संघात बदल होण्याची शक्यता नाही.
वाचा-
कसोटी मालिकेसाठी गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यासोबत नवदीप सैनीच्या ऐवजी कुलदीप यादवचा विचार केला जाऊ शकतो.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News