न्यूयॉर्क: करोना व्हायरसचा धोका असताना जगभरात काही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धासाठी जैव वातावरणाची निर्मिती केली जाते आणि खेळाडूंना सुरक्षित ठेवले जाते. खेळाडू आणि त्या स्पर्धेशी संबंधित सर्व जणांना हॉटेलमध्ये ठेवले जाते. फुटबॉल, टेनिस, क्रिकेट सर्व स्पर्धेसाठी हा नियम लागू आहे. पण अशाच स्पर्धेसाठी गेलेल्या एका खेळाडूने हॉटेल ऐवजी एक घरच भाड्याने घेतले आहे. ज्याचे भाडे ४० हजार डॉलर म्हणजे ३० लाख रुपये इतके आहे.

यूयॉर्क शहरात सध्या स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या नोवाक जोकोविचने हॉटेलवर थांबण्याऐवजी एक मोठे घरच भाड्याने घेतले. ही स्पर्धा महिनाभार चालणार असून त्यासाठी जोकोविचने ३० लाख रुपये भाडे दिले आहे.

वाचा-
जोकोविचे आतापर्यंत करिअरमध्ये १४ कोटी डॉलर इतकी कमाई केली आहे. या शिवाय जाहीरातीतून मिळालेले उत्पन्न काही कोटी डॉलरमध्ये आहे. त्यामुळेच करोना काळात धोका न पत्करता त्याने स्वत:साठी स्वतंत्र बंगलाच भाड्याने घेतला आहे.

वाचा-
स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केल्यानंतर तो म्हणाला, मला हॉटेलच्या ऐवजी दुसऱ्या घराचा पर्याय देण्यात आला तेव्हा मी घराची निवड केली. सर्व खेळाडूंकडे असा पर्याय होता. ते स्वतंत्रपणे राहू शकले असते.

वाचा-
या वर्षी करोना व्हायरस असताना देखील अनेक खेळाडू स्पर्धेसाठी आले आहेत. त्यांनी हॉटेलमध्ये खेळण्यासाठी प्राधान्य दिले आहे. याचा खर्च अमेरिकन टेनिस संघाकडून केला जात आहे. पण जर एखादा खेळाडू त्याच्या सहकाऱ्यासाठी स्वतंत्र रुमचा आग्रह करत असेल तर त्याचा खर्च त्याला स्वत:ला करावा लागेल.

अमेरिकन ओपन स्पर्धा खेळण्यास आलेल्या जोकोविचसह आठ खेळाडूंनी लॉग आयर्लंड येथे स्वतंत्र घर भाड्याने घेतले आहे. यात सेरेना विलियम्स आणि मिलोस राओनिच यांचा समावेश आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here