वाचा-
आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंचा सहभाग असू नये, यावर बराच वाद झाला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंना आयपीएलपासून शक्यतो दूर ठेवण्यात आले. पण आता तर आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन संघाचे मालक नेस वाडिया यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुढे आले आहे.
वाचा-
किंग्स इलेव्हन पंजाब हा संघ बॉलीवूड अभिनेत्री प्रीति झिंटा आणि नेस वाडिया यांच्या मालकीचा आहे. या दोघांचे प्रेम प्रकरण होते. पण काही कारणास्तव त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण संघातील भागीदारी मात्र त्यांची अजूनही कायम आहे.
वाचा-
नेस वाडिया हे पाकिस्तानचे संस्थापक असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांचे पणतू असल्याचे आता समोर आले आहे. जिन्ना यांना एकुलती एक मुलगी होती, ज्यांचे नाव डिना होते. डिना यांनी नेव्हिल वाडिया यांच्याबरोबर लग्न केले. नेस वाडिया हे डिना यांचा नातू आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नेस वाडिया यांचे पाकिस्तानबरोबरचा संबंध पुढे आल्याचे समजते आहे. या गोष्टीचा आता आयपीएलवर काही परीणाम होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. कारण आतापर्यंत स्पर्धा सुरु झालेली नसली तरी बरेच विघ्न आयपीएलपुढे आलेली आहेत.
वाचा-
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सुरुवातीपासून आयपीएलमध्ये आहे, पण त्यांना अजून एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. लोकेश राहुल हा पंजाबच्या संघाचा कर्णधार आहे, तर अनिल कुंबळे हे पंजाबच्या संघाचे प्रशिक्षक आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times