वाचा-
गेले काही दिवस चेन्नई संघासाठी प्रचंड काळजीत टाकणारे आणि निराश करणारे होते. पण आता एक चांगली बातमी येत आहे. सलग दुसऱ्या करोना चाचणीच्या रिपोर्टमध्ये सर्व खेळाडू आणि अन्य सहकारी यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने आता धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा संघ मैदानात सरावासाठी उतरू शकतो.
वाचा-
गुरुवारी सर्व खेळाडू आणि अन्य सहकारी यांची करोना चाचणी घेण्यात आली होती आणि त्याचे रिपोर्ट शुक्रवारी सकाळी आले. सलग दुसरा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर आज शुक्रवारी चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सर्व खेळाडू मैदानावर सराव आणि ट्रेनिंग करू शकतील.
वृत्तसंस्थेशी बोलताना सीएसके संबंधित एका सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी करण्यात आलेले सर्व रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत आणि आजपासून आम्ही सराव करू शकू. याआधी ज्या खेळाडूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना १४ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची चाचणी नंतर घेतली जाईल.
वाचा-
आयपीएलसाठी युएईमध्ये दाखल झालेल्या आठ पैकी सात संघांनी ट्रेनिंग आणि सराव सुरू केला आहे. आता चेन्नईचा संघ हा अखेरचा संघ ठरेल. सरावासाठी मैदानात उतरण्याआधीच्या तिसऱ्या करोना चाचणीत १३ जणांना कोरनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
आयपीएलशी संबंधित कोणाला करोना झाला आहे, त्यांची नावे बीसीसीआयने उघड केली नव्हती. पण ज्यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे बीसीसीआयने सांगितले. सीएसके वगळता बीसीसीआयचा एका वैद्यकीय अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times