नवी दिल्ली: जागतिक क्रमवारीत १२४व्या क्रमांकावर असलेल्या भारताचा स्टार याने स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामना जिंकून सर्वांना धक्का दिला होता. सुमितने ब्रॅडली क्लॅनचा ६-१, ६-३, ३-६ आणि ६-१ असा पराव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

वाचा-
दुसऱ्या फेरीत सुमितची लढत ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीम याच्याशी होती. या लढतीत मात्र त्याचा ६-३, ६-३, ६-२ असा पराभव झाला. सुमितने जेव्हा दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तेव्हा सात वर्षानंतर एक भारतीय खेळाडू पुरुष एकेरीत विजय मिळवला होता. सुमितच्या आधी २०१३ साली सोमदेव देववर्मनने विजय मिळवला होता.

वाचा-
ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने दुसऱ्या फेरीत सुमित नागलचा सहज पराभव केला. सुमितचा भलेही पराभव झाला असला तरी त्यानंतर देखील त्याला ७३ लाख रुपये मिळाले.

हरियाणातील झज्जर येथे १६ ऑगस्ट १९९७ रोजी जन्मलेल्या सुमितने २०१५ साली विम्बल्डनच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा तो सर्व प्रथम चर्चेत आला होता. महेश भूमतीने स्वत:च्या अकादमीमध्ये त्याला प्रशिक्षण दिले आहे. त्यानंतर त्याला जर्मनीत टेनिसचे प्रशिक्षण मिळाले. करोनामुळे तो जर्मनीत अडकला होता.

वाचा-
२०१९च्या अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याने सर्वांना हैराण केले होते. तेव्हा त्याने रॉजर फेडररविरुद्धच्या पुरुष एकेरीत एक सेट जिंकला होता. सर्वाधिक ग्रॅड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या फेडररने देखील सुमितच्या खेळाचे तेव्हा कौतुक केले होते.

सुमितने २०१६ साली डेव्हिस कप टीममध्ये पदार्पण केले होते. वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ सामन्या स्पेनविरुद्ध तो खेळला होता. पण त्यानंतर काही वादामुळे त्याच्यावर अनुशासनात्मक कारवाई केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here