वाचा-
आयपीएलमधील आठ संघ युएईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या होणार आहे. कारण हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. पण चेन्नई संघातील अन्य खेळाडूंची करोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचे टाळले.
चेन्नईच्या खेळाडूंची सलग दुसरी चाचणी नेगेटिव्ह आल्यामुळे आता पहिला सामना ठरल्यानुसार मुंबई विरुद्ध चेन्नई असाच होईल.
वाचा-
गेल्या आठवड्यात चेन्नई संघातील १३ जणांना करोना झाल्याने काळजीची स्थिती निर्माण झाली होती. चेन्नई संघाच्या क्वारंटाइनचा कालावधी एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला होता. तेव्हा अशी चर्चा होती की पहिला सामना मुंबई आणि अन्य संघात होईल. पण आता चेन्नईचा संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाल्याचे समजते.
वाचा-
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआने सात समालोचक निश्चित केले आहेत. यात सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोपडा, रोहन गावसकर आणि हर्षा भोगले यांचा समावेश आहे. हे सर्व जण १० सप्टेंबर रोजी युएईला रवाना होतील.
समालोचक दोन गटात विभागले जातील एक गट दुबई आणि शारजाह येथे तर दुसरा अबूधाबी येथे थांबणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times