वाचा-
चेन्नईच्या संघाच्या समस्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. कारण चेन्नईच्या संघाील १४ सदस्य करोना पॉझिटीव्ह सापडले होते. त्यानंतर शनिवारी तडकाफडकी रैनाने संघाला सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि तो युएईमधून भारतामध्ये दाखल झाला होता. आता चेन्नईच्या संघाला दुसरा धक्का बसला आहे. कारण आता एका अनुभवी खेळाने चेन्नईच्या संघाची साथ सोडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या संघाची चिंता नक्कीच वाढलेली पाहायला मिळत आहे.
वाचा-
आयपीएल खेळण्यासाठी चेन्नईच्या संघाचा अनुभवी क्रिकेटपटू हरभजन सिंग हा १ सप्टेंबरपर्यंत युएईमध्ये दाखल होणार होता. पण १ सप्टेंबरला हरभजन युएईमध्ये पोहोचला नाही. त्यानंतर हरभजन काही दिवसांमध्ये चेन्नईमध्ये दाखल होईल, असे संघाकडून सांगण्यात आले होते. पण तसेही झाले नाही. त्यामुळेच हरभजनने चेन्नईच्या संघाला सोडचिठ्ठी दिली असल्याचे वृत्त दैनिक जागरणने प्रसिद्ध केले आहे.
हरभजन चेन्नईच्या संघातून यावर्षी खेळणार नाही, असे बऱ्याच वर्तमानपत्रांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. हरभजन आज (१सप्टेंबर) दुपारी दुबईला रवाना होणार होता. पण त्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. त्याचबरोबर हरभजनच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले होते की, चेन्नईच्या संघातील खेळाडूंना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हरभजन दुबईला जाण्याची तारीख बदलू शकतो किंवा यावर्षीच्या आयपीएमधून माघारही घेऊ शकतो.
वाचा-
याबाबत चेन्नईच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. विश्वनाथ यांनी सांगितले की, ” हरभजन आपल्या कुटुंबियांबरोबर होता. पण तो १ सप्टेंबरला दुबईला आयपीएल खेळण्यासाठी पोहोचणार होता. पण अजूनही हरभजन दुबईला पोहोचलेला नाही.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times