वाचा-
बीसीसीआयने सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोपडा, रोहन गावसकर आणि हर्षा भोगले यांचा कमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे. हे सर्व जण १० सप्टेंबर रोजी युएईला रवाना होणार आहेत. या पॅनलला दोन गटात विभागले जाणार आहे. पहिला गट दुबई आणि शारजाह येथे असेल तर दुसरा अबू धाबी येथून समालोचन करेल.
वाचा-
मांजरेकरांना डच्चू
बीसीसीआयने या पॅनलमध्ये मांजरेकरांना स्थान दिले नाही. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या एका वादानंतर मांजरेकर चर्चेत आले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना कमेंट्री पॅनलमधून हटवले होते. विशेष म्हणजे यासंदर्भात संजय मांजरेकर यांनी पत्र लिहून माफी मागितली होती.
बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मार्च महिन्यातील वनडे मालिकाआधी मांजरेकर यांना समालोचक पदावरून हटवण्यात आले.
वाचा-
कशामुळे मांजरेकरांना हटवले
गेल्या वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेत संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजासंदर्भात एक वक्तव्य केले होते. त्यावर टीम इंडियातील काही खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर मांजरेकर यांना कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्यात आले होते.
वाचा-
मांजरेकरांचे पत्र
मांजरेकरांनी जुलै महिन्यात बीसीसीआयला पत्र लिहले होते. त्यात ते म्हणाले होते- आदरणीय सदस्य, आशा आहे की तुम्ही सर्व जण ठीक असाल. तुम्हाला याआधीही माझा इमेल मिळाला असेल. ज्यात मी समालोचक म्हणून काम करण्याबाबत माझी भूमिका स्पष्ट केली होती. आता आयपीएलच्या तारखांची घोषणा झाली आहे आणि बीसीसीआय टीव्ही लवकरच कॉमेंटरी पॅनलची निवड करेल. तुमच्याद्वारे निश्चित केलेल्या नियमानुसार काम करण्यास मला नक्की आवडेल. अखेर मी तुमच्या प्रॉटक्शनच्या नियमानुसार काम करतो. गेल्या वेळी कदाचीत मला या नियमांची पूर्ण माहिती नव्हती. धन्यवाद.
वाचा-
मांजरेकरांच्या बाबत अंतिम निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हेच करणार होते. आता ज्या लोकांची निवड झाली आहे त्यावरून मांजरेकर यांच्या माफीनाम्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times