क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशा घडतात की त्या आवर्जुन पाहण्यासारख्या असतात. अशीच एक गोष्ट भारताचा क्रिकेटपटू प्रवीण तांबेच्या बाबतीतही पाहायला मिळाली आहे. कारण वयाच्या ४८व्या वर्षी प्रवीणने एक अफलातून झेल घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या कॅचचा व्हिडीओ क्रिकेट विश्वामध्ये आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाला आहे.

वाचा-

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये खेळणार प्रवीण हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या लीगमध्ये प्रवीण हा त्रिनबागो नाइट रायडर्स या संघातून खेळत आहे.

त्रिनबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स या संघात एक सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात त्रिनबागो नाइट रायडर्स क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्सचा फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स संघाचा एव्हिन लुईस यावेळी फलंदाजी करत होता. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लुईसने एक मोठा फटका मारला. हा फटका सीमारेषेजवळ जाईल असे वाटत होते. पण त्यावेळी प्रवीणने हवेत सूर लगावत सुपर कॅच पकडल्याचे पाहायला मिळाले. प्रवीणच्या या अप्रतिम झेलचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

वाचा-

सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्सविरुद्धच्या सामन्यातही प्रवीणने अचूक गोलंदाजीचा नमुना पेश केला. कारण प्रवीणने चार षटकांमध्ये फक्त १२ धावा दिल्या. त्याचबरोबर त्याने एक बळी मिळवत एक षटक निर्धावही टाकले. त्याचबरोबर लुईसचा अप्रिम झेलही पकडला. या सामन्यात नाइट रायडर्स संघाने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स संघावर ५९ धावांनी दमदार विजय मिळवला. आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये नाईट रायडर्स संघाने आठ विजय मिळवले असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here