नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे क्रिकेट सामन्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या देशात क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत. लवकरच युएईमध्ये आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरुवात होत आहे. क्रिकेटमध्ये सध्या फार घडामोडी घडत नसल्या तरी एका कॅचचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

वाचा-
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या कसोटी सामन्यातील या व्हिडिओ भारताच्या रविंद्र जडेजाने हवेत झेप घेऊन कॅच घेतला होता. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कॅचमध्ये याचा समावेश होतो.

वाचा-
न्यूझीलंडने भारताविरुद्धचा सामना सात विकेटनी जिंकला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्या आधी न्यूझीलंडने पहिला कसोटी सामना १० विकेटनी जिंकला होता.

वाचा-

करोनामुळे गेल्या चार -पाच महिन्यात अनेक क्रिकेट मालिका स्थगित करण्यात आल्या. आता या महिन्यात सर्वात श्रीमंत टी-२० लीग आयपीएलची सुरुवात होत आहे. आज त्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील आठ संघ युएईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या होणार आहे. कारण हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. पण चेन्नई संघातील अन्य खेळाडूंची करोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचे टाळले. चेन्नईच्या खेळाडूंची सलग दुसरी चाचणी नेगेटिव्ह आल्यामुळे आता पहिला सामना ठरल्यानुसार मुंबई विरुद्ध चेन्नई असाच होईल.

वाचा-

BCCI कडून संजय मांजरेकरांना डच्चू!
बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठीच्या समालोचक अर्थात कमेंट्री पॅनलची घोषणा केली. यात बीसीसीआयने सात भारतीय लोकांना स्थान दिले आहे. पण त्याच संजय मांजरेकर यांचा समावेश नाही. विशेष म्हणजे ते २००८ पासून आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत. सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोपडा, रोहन गावसकर आणि हर्षा भोगले यांचा कमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here