नवी दिल्ली: भारताचा अनुभवी फिरकीपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू याने आयपीएलच्या १३व्या हंगामातून नाव मागे घेतले आहे. हरभजनने काल शुक्रवारी सोशल मीडियावरून या वर्षी खेळणार नसल्याचे सांगितले.

वाचा-
मी या वर्षी काही वैयक्तीक कारणांमुळे आयपीएल खेळणार नाही. हा कठीण काळ आहे आणि मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापनाने खुप सहकार्य केले. चेन्नई संघाला आयपीएलमधील यशसाठी शुभेच्छा. सुरक्षीत रहा जय हिंद!, असा मेसेज हरभजनने सोशल मीडियावर केला होता.

वाचा-

याआधी चेन्नईचा उपकर्णधार सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली होती. युएईला पोहोचल्यानंतर रैनाने माघार घेतली आणि तो भारतात परतला होता.

वाचा-
हरभजन सिंगच्या निर्णयाबद्दल बोलताना त्याच्या एका मित्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, चेन्नई टीममध्ये करोना रुग्ण सापडल्याने त्याने आयपीएलमधून माघार घेतली नाही. तो पत्नी आणि तीन महिन्याची मुलगी यांच्या काळजीपोटी त्याने हा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत तो क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष्य केंद्रीत करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही २ कोटी काय २० कोटी दिला तरी फरक पडत नाही. पैसा सर्वात शेवटी तुमच्या डोक्यात येतो.

चेन्नई संघ सरावासाठी उतरला
करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना वगळता कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचे अन्य खेळाडूंनी शुक्रवारी रात्री सराव केला. या सर्वांची करोनाची सलग तिसरी चाचणी नेगेटिव्ह आल्याने त्यांनी नेटमध्ये सराव केला. गेल्या आठवड्यात दीपक आणि ऋतुराज या दोन खेळाडूंसह ११ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वारंटाइनचा कालावाधी वाढवण्यात आला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here