दुबई: करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना वगळता कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचे अन्य खेळाडूंनी शुक्रवारी रात्री सराव केला. या सर्वांची करोनाची सलग तिसरी चाचणी नेगेटिव्ह आल्याने त्यांनी नेटमध्ये सराव केला. गेल्या आठवड्यात दीपक आणि ऋतुराज या दोन खेळाडूंसह ११ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वारंटाइनचा कालावाधी वाढवण्यात आला होता.

वाचा-
गुरुवारी या सर्व खेळाडूंची एक अतिरिक्त करोना चाचणी घेण्यात आली होती. ज्याचा रिपोर्ट शुक्रवारी सकाळी आला आणि चेन्नई संघाच्या सरावाचा मार्ग मोकळा झाला. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वानाथन म्हणाले, त्या १३ खेळाडूंना वगळता बाकी सर्वांची करोना चाचणी तिसऱ्यांदा नेगेटिव्ह आली आहे. ज्या १३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यांची १४ दिवसांनी पुन्हा चाचणी केली जाईल.

वाचा-
आयपीएलची सुरूवात १९ तारखेला होत असून त्याआधीच चेन्नई संघाला दोन मोठे धक्का बसले आहेत. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी अचानक माघार घेतल्यामुळे चेन्नई संघाचे टेन्शन वाढले आहे.

वाचा-
दुबईत पोहोचल्यानंतर चेन्नई संघाने नेटमध्ये जोरदार सराव केला. कर्णधार धोनीने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर शानदार फलंदाजी केली. संघाने या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. धोनीला पुन्हा एकदा मैदानात सराव करताना पाहून चाहते खुश झाले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here