वाचा- वाचा- काँग्रेसचे खासदार यांनी सचिन तेंडुलकरच्या कर्णधापदासंदर्भात बोलताना सांगितले की, जेव्हा सचिन भारतीय संघाचे नेतृत्व करत होता तेव्हा भलेही त्याच्याकडे एक मजबूत संघ नसला तरी तो एक प्रेरणादायी कर्णधार नव्हता. स्पोर्ट्सक्रीडाच्या फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये बोलताना शशी थरूर यांनी सचिनच्या कर्णधारपदाच्या काळाचा उल्लेख केला.
वाचा-
जेव्हा सचिन भारताचा कर्णधार नव्हता तेव्हा वाटत होते की भारताच्या संभाव्य कर्णधारामध्ये तो सर्वोत्तम पर्याय आहे. कारण तो जेव्हा कर्णधार नव्हता तेव्हा अॅक्टीव्ह होता आणि स्पिपमध्ये फिल्डिंग करायचा. कर्णधाराकडे धावत जायचा आणि सल्ला देत असे.
वाचा-
पण जेव्हा तो स्वत: कर्णधार झाला तेव्हा त्याच्याकडे मजबूत टीम नव्हती आणि त्याने स्वत: देखील मान्य केले होते की तो एक प्रेरणादाई कर्णधार नव्हता. कदाचीत त्याला कर्णधाराच्या जबाबदारीसोबत स्वत:च्या बॅटिंगसाठी वेळ द्यावा लागत असेल. शेवटी त्याने स्वत:हून कर्णधारपद सोडले आणि जेव्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली तेव्हा ती घेतली नाही.
वाचा-
सचिनला १९९६ साली कर्णधापदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच्या कार्यकाळात ७३ वनडे आणि २५ कसोटी सामने खेळले गेले. यात भारताची कामगिरी फार समाधानकारक झाली नाही. ७३ पैकी ४३ वनडेत पराभव आणि फक्त २३ मध्ये विजय मिळवता आला. विजयाची सरासरी ३५.०७ टक्के इतकी होती. तर २५ पैकी ९ कसोटीत विजय मिळवता आला. कसोटीतील विजयाची टक्केवारी फक्त १६ इतकी होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times