वाचा- वाचा- ANI या वृत्तसंस्थने बृजेश पटेल यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार आता १९ सप्टेंबरपासून युएईत सुरू होणाऱ्या २०२०चे वेळापत्रक उद्या म्हणजे रविवारी जाहीर केले जाईल.
वाचा-
वाचा-
या वर्षी करोनामुळे मार्च महिन्यात सुरू होणारी स्पर्धा आता सप्टेंबर महिन्यात होत आहे. भारतात कोरना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन ही स्पर्धा युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी विंडो मिळाला.
वाचा-
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील संघ आणि चाहते वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. आयपीएलमधील आठ संघ युएईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या होणार आहे. कारण हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. पण चेन्नई संघातील अन्य खेळाडूंची करोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचे टाळले होते. आता चेन्नईच्या खेळाडूंची सलग दुसरी चाचणी नेगेटिव्ह आली आणि त्यांनी सराव देखील सुरू केल्याने पहिला सामना ठरल्यानुसार मुंबई विरुद्ध चेन्नई असाच होईल.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times