वाचा-
रैनाच्या काकांवर जो हल्ला झाला ते क्षेत्र सनी देओलचे आहे, सनी या भागातून खासदार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे आता रैनाच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सनी पुढे सरसावला आहे. सनीने पठाणकोट भागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी गुलनीत सिंग खुराना यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सनीने परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर यापुढे काय करता येऊ शकते, हेदेखील सनीने जाणून घेतले.
याबाबत सनीने एक ट्विट केले आहे. या प्रकरणाबाबत सनी म्हणाला की, ” सुरेश रैनाच्या कुटुंबियांचे जे प्रकरण आहे, त्याची मी सविस्तर माहिती घेतली आहे. रैनाच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळेल. या हल्लात प्राण गमावलेल्या रैनाच्या कुटुंबियांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.”
काही दिवसांपूर्वी रैनाच्या काकांच्या कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात काकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तो तातडीने आयपीएलसोडून भारतात परतला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या रैनाच्या चुलत भावाचा सोमवारी मृत्यू झाला. रैनाने स्वत: ही माहिती सोशल मीडियावरून दिली. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू रैनाने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पंजाब पोलिसांना या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.
वाचा-
पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत जे झाले ते भयानक होते. माझ्या काकांची हत्या झाली. दोन चुलत भावांना गंभीर जखमी केले. गेल्या काही दिवसांपासून माझा भाऊ मृत्यूशी लढत होता. आता त्याचा मृत्यू झाल. माझ्या काकींची तब्येत गंभीर आहे. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे, असे रैनाने म्हटले होते. रैनाच्या नातेवाईकांवर पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यातील थरियाल गावात १९ आणि २० सप्टेंबरच्या रात्री हल्ला करण्यात आला होता.
एका पाठोपाठ एक केलेल्या ट्विटमध्ये रैना म्हणाला की, आज पर्यंत आम्हाला कळाले नाही की त्या रात्री काय झाले होते. कोणी असे केले होते. मी पंजाब पोलिसांनी या प्रकरणावर गंभीर तपास करावा. आम्हाला किमान हे तरी जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्यांच्या सोबत असे कृत्य कोणी केली. हे कृत्य केलेल्यांना सोडता कामा नये.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times