महेंद्रसिंग धोनीने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. पण तरीही धोनीच्या चाहत्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. त्यामुळेच करोना असूनही चाहते धोनीची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे युएईमध्येही पाहायला मिळाले आहे. करोना असूनही चाहत्यांनी धोनीचा एक लूक पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. या गोष्टीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ युएईमध्ये दाखल झाला आणि काही दिवसांनीच संघाला काही समस्यांचा सामना करावा लागला. कारण चेन्नईच्या संघातील १४ सदस्य करोना पॉझिटीव्ह सापडले होते. त्यानंतर संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने तडताफडकी युएई सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो या आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे त्याने सांगितले. रैनानंतर हरभजन सिंगनेही चेन्नईच्या संघाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे चेन्नईच्या संघापुढील अडचणी वाढलेल्या आलेत, असे म्हटले जात आहे.

धोनी आता जास्तीत जास्त २-३ वर्षे आयपीएल खेळेल, असे म्हटले जात आहे. पण त्यानंतर चेन्नईचे नेतृत्व कोण सांभाळणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. धोनीलाही ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच धोनीने आता चेन्नईच्या भावी कर्णधाराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे धोनी आता किती काळ मैदानात खेळताना दिसेल, हे चाहत्यांना माहिती नाही. त्यासाठी धोनीला बघण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

धोनीने यावेळी आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. धोनी चेन्नई संघाबरोबरचा सराव संपवून आपल्या बसमध्ये बसण्यासाठी स्टेडियमबाहेर दाखल झाला होता. त्यावेळी चाहत्यांनी त्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. धोनीला पाहिल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यावेळी धोनीनेही हात दाखवत आपल्या चाहत्यांच्या भावनांचा स्वीकार केला.

दुबईत पोहोचल्यानंतर चेन्नई संघाने नेटमध्ये जोरदार सराव केला. कर्णधार धोनीने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर शानदार फलंदाजी केली. सीएसके संघाने या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. धोनीला पुन्हा एकदा मैदानात सराव करताना पाहून चाहते खुश झाले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here