यावर्षीच्या आयपीएलच्या वेळापत्रकाला अखेर मुहुर्त मिळाला आणि ते आज जाहीर करण्यात आले. आयपीएलचे सामने रात्री ७.३० मिनिटांनी सुरु होतील, असे आतापर्यंत सांगण्यात आले आहे. पण आयपीएलमध्ये एकाच दिवशी जर दोन सामने असतील तर ते किती वाजता सुरु होतील, जाणून घ्या…

यावर्षीच्या आयपीएलमध्ये सलामीची लढत ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्येच होणार आहे. गेल्यावर्षी मुंबईने जेतेपद पटकावले होते, तर चेन्नईचा संघ उपविजेता होता. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये १९ सप्टेंबरला यावर्षीच्या आयपीएलचा पहिला सामना होणार आहे.

आयपीएलमध्ये शनिवारी आणि रविवारी दोन सामने ठेवण्यात येतात. यावर्षीही असेच सामन्यांचे आयोजन केले आहे. त्यामुळे जर दोन सामने होणार असतील तर आयपीएलमधील पहिला सामना हा दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु करण्यात येणार आहे. यापूर्वी आयपीएलचे दुपारचे सामने चार वाजता सुरु व्हायचे. पण युएईमधील वेळा पाहून वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील संघ आणि चाहते वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. आयपीएलमधील आठ संघ युएईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या होणार आहे. कारण हे दोन्ही संघ गतविजेते आणि उपविजेते आहेत. पण चेन्नई संघातील अन्य खेळाडूंची करोना चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहण्यासाठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर करण्याचे टाळले होते. आता चेन्नईच्या खेळाडूंची सलग दुसरी चाचणी नेगेटिव्ह आली आणि त्यांनी सराव देखील सुरू केल्याने पहिला सामना ठरल्यानुसार मुंबई विरुद्ध चेन्नई असाच होणार आहे

आयपीएलचे आयोजन करताना वातावरणाचा विचार करणेही महत्वाचे असते. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबुधाबी येथे आहे. त्यामुळे अबुधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबुधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परीणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यासाठी वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहत्यांना मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहीलेली होती.

वाचा-

आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत होती. पहिली गोष्ट तर करोनाचं संकट तर आहेच. पण त्याचबरोबर सर्वात युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरणार आहे. त्यामुळे कडक गर्मी जाणवत आहे. त्यामुळेच खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here