न्यूयॉर्क: जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू नोवाक जोकोविकला टेनिस स्पर्धेतून बाहेर करण्यात आले. एका महिला अधिकाऱ्याला चेंडू मारल्या प्रकरणी जोकेविचला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले. रविवारी सर्बियाचा जोकोविच आणि स्पेनचा पाब्लो करेनो बुस्टा यांच्यात प्री क्वार्टर फायनल (अंतिम १६)ची मॅच सुरू होती.

बुस्टाविरुद्धच्या लढतीत जोकोविच पहिल्या सेटमध्ये ५-६ अशा पिछाडीवर होता. तेव्हा त्याने रागाच्या भरात चेंडू मारला. जो एका कोर्टवर उभ्या असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला लागला आणि त्या खाली पडल्या.

वाचा- घेतले

महिलेला चेंडू लागल्याची चूक लक्षात आल्यावर जोकोविच तातडीने त्याच्याकडे केला. संबंधित महिला अधिकाऱ्याला श्वास घेण्याचा त्रास होत होता. काही मिनिटांनी त्या तेथून निघून गेल्या. या घटनेनंतर रेफरीने अंपायरशी १० मिनिटे चर्चा केली आणि जोकोविचचा प्रतिस्पर्धी बुस्टाला विजयी घोषित करण्यात आले.

वाचा-
या घोषणेनंतर जोकोविचने त्याला शुभेच्छा दिल्या आणि कोर्टातून बाहेर पडला. ग्रॅड स्लॅम स्पर्धेत होणारा जोकोविच जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी १९९० साली जॉन मॉकेनरोला ऑस्ट्रेलियन ओपन आणि २००० साली स्टफान कोबेके याला फ्रेंच ओपनमधून अपात्र करण्यात आले होते.

रॉजर फेडरर आणि राफेल नडाल या दोघांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने या वर्षी अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाचा मुख्य दावेदार जोकोविच मानला जात होता. जोकेविचने आतापर्यंत १७ ग्रॅल स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर फेडररने २० आणि नडालने १९ विजेतेपद मिळवली आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here