दुबई: आयपीएलचा १३वा हंगाम १२ दिवसांवर आला आहे. काल बीसीसीआयने या स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर केले. काही दिवसांपूर्वी तीन वेळा विजेतपद मिळवणाऱ्या चेन्नई संघातील दोन खेळाडूंसह १३ जणांची करोना चाचमी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे एकूण स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. चेन्नई संघासाठी तर हा मोठा धक्का मानला जात होता. पण त्यानंतर अन्य खेळाडूंचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आणि पहिला सामना खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.

वाचा-
चेन्नई संघातील सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने मध्ये आता नव्याने कोणताही अडथळा येणार नाही असे वाटत असताना संघाच्या एका सदस्याला कोरना झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली संघाचे फिजिओथेरेपिस्टची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित फिजिओथेरेपिस्टला संघातील अन्य सदस्यांपासून वेगळ क्वारंटाइन करण्यात आल्याचे दिल्ली संघाने सांगितले.

संबंधित फिजिओथेरेपिस्टच्या सुरुवातीचे दोन टेस्ट नेगेटिव्ह आल्या होत्या. पण आता त्याची तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याआधी ते अन्य कोणालाही भेटले नव्हते. त्यांना आता डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.

वाचा-
काल रविवारी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुरद्ध गतउपविजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर दिल्ली संघाचा पहिला सामना २० सप्टेंबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा सामा २५ सप्टेंबर रोजी चेन्नईविरुद्ध होईल.

युएईमध्ये स्पर्धा होत असल्याने सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दुपारी होणारे सामने साडेतीन वाजता तर रात्री होणारे सामने साडेसात वाजता होतील. या वर्षी दिल्ली संघा आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंचा समावेश आहे. तर श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here