नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये सध्या अर्थात डिसीजन रिव्ह्यू सिस्टमचा बोलबाला आहे. एखादा खेळाडूला अपील केल्यानंतर अंपायरने बाद दिले नाही किंवा अंपायरचा निर्णय चुकला असे वाटले तर संबंधित गोलंदाज अथवा फलंदाज त्याविरुद्ध तिसऱ्या पंचाकडे दाद मागू शकतो. क्रिकेटमधील या नियमाचा वापर करताना अनेक दिग्गज खेळाडूंकडून चुका होतात. अशीच एक घटना रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रलिया या संघातील सामन्यात झाली.

वाचा-
साउथम्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज आदिल रशीदच्या चेंडूर अॅरॉन फिंचने अशा घेतला ज्याने इंग्लंड संघाची लाज काढली.

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना पॉवर प्ले संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने चेंडू आदिल रशीदकडे सोपवला. रशीदने त्याच्या ओव्हरचा तिसऱ्या चेंडू फिंचला लाटला. त्याने तो सुरक्षितपणे खेळला. हा चेंडू फिंचच्या बॅटला लागला होता. पण विकेटकीपर जोस बटलर आणि रशीद यांना मात्र तो पॅडला लागल्याचे वाटले. फिंच निश्चितपणे LBW असेल असे वाटल्याने त्यांनी जोरदार अपील केली. ज्यावर अंपायरने बाद दिले नाही.

वाचा-

इंग्लंडच्या खेळाडूंना वाटले हीच संधी आहे. म्हणून त्यांनी डीआरएस घेतला. पण जेव्हा मोठ्या पडद्यावर रिव्ह्यू पाहिला तर इंग्लंडच्या खेळाडूंना स्वत:ची लाज वाटली. कारण चेंडू बॅटला लागल्याचे दिसत होते. बर यात चेंडू फिंचच्या बॅटच्या मध्ये लागला होता. अगदी पहिल्या नजते देखील कोणी सांगू शकले असते की चेंडू पॅडला लागला नाही.

वाचा-

या निर्णयावर सोशल मीडियावर इंग्लंडच्या संघावर जोरदार टीका होत आहे. अनेक जण त्यांना ट्रोल करत आहेत. काहींच्या मते जर सर्वात खराब DRSसाठी पुरस्कार ठेवला गेला असता तर तो इंग्लंडलाच मिळेल.

वाचा-

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ विकेटनी पराभव झाला आणि इंग्लंडने मालिका २-० ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here