नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची दहशत आहे. गेल्या काही काळाज वॉर्नरने कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये शानदार अशी कामगिरी केली आहे. वॉर्नरची विकेट घेणे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ बाद केल्या प्रमाणे असते. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५व्या स्थानावर आहे.

वाचा-
गेल्या आठ वर्षात वॉर्नर कधीच टी-२० क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला नव्हता. त्याला शून्यावर बाद करण्याची कामगिरी इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने केली आहे. रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एका शानदार चेंडूवर आर्चरने वॉर्नरची शून्यावर विकेट घेतली.

वाचा-
साउथम्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल असे बोलले जात होते. हे माहित असून देखील ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांनी घेतला. पॉवर प्लेमध्येच ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज बाद झाले. त्यात वॉर्नर शून्यावर माघारी परतला.

वाचा-
पहिल्या टी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या वॉर्नरला आर्चरने टाकलेला चेंडू खेळता आला नाही. गुड लेंथच्या या चेंडूने वॉर्नरच्या ग्लव्सला स्पर्श केला. इंग्लंडच्या अपीलवर अंपयरने त्याला बाद दिले. पण वॉर्नरने त्यावर DRS घेतला. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद म्हणून जाहीर केले.

वाचा-
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १५७ धावा केल्या. इंग्लंडने विजयाचे लक्ष्य चार गड्यांच्या मोबदल्यात आणि सात चेंडू राखून विजय मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here