वाचा-
काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघातील १४ सदस्यांना करोना झाला होता. या परिस्थितीला घाबरून चेन्नईचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने संघाला सोडले होते. रैनानंतर करोनाला घाबरून हरभजन सिंगनेही यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण आयपीएलमधील एक खेळाडू असा आहे की, करोनाला आपण घाबरणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. करोना झाल्यावरही आपण त्यामधून उभे राहू, असे या क्रिकेटपटूने म्हटले आहे.
वाचा-
क्रिकेट खेळताना करोनाची भिती वाटत नाही का, असा प्रश्न भारताचा सलामीवीर शिखर धवनला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना धवनने सांगितले की, ” मला माझ्या शरीरावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे करोनाला मी घाबरत नाही. मला माहिती आहे की, करोनाचा शिकार मीदेखील होऊ शकतो. पण मी करोनाशी लढू शकतो. आम्ही सर्व सुरक्षेचे नियम पाळत आहोत. आमच्या ८-९ वेळा करोनाच्या चाचण्याही झाल्या असून त्या निगेटीव्ह आल्या आहेत.”
वाचा-
धवन पुढे म्हणाला की, ” या आयपीएलचे काही फायदेही आहेत. या आयपीएलमध्ये जास्त प्रवास आम्हाला करावा लागणार नाही. त्यामुळे प्रवासामध्ये खेळाडू जास्त थकणार नाहीत आणि त्यांना आपल्या खेळावर जास्त लक्ष केंद्रीत करायला वेळ मिळेल. त्यामुळे या आयपीएलचा खेळाडूंना नक्कीच चांगला फायदा होणार आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सर्वच खेळाडू उत्सुक आहेत. त्यामुळे यावर्षी आयपीएल चांगलीच रंगतदार होईल, असा विश्वास सर्वांनाच आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times