चेन्नईच्या संघाला तडकाफडकी सोडून निघणारा सुरेश रैना आता पुनरागमनासाठी सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. कारण रैनाने व्यायामाला जोरदार सुरुवात केली आहे. रैनाच्या व्यायामाचा हा खास व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. पण रैनाला आता चेन्नईच्या संघात परतायचे असेल तर त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. बीसीसीआयने परवानगी दिल्यावरच रैना आयपीएल खेळू शकतो.

वाचा-

काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघातील १४ सदस्यांना करोना झाला होता. या परिस्थितीला घाबरून चेन्नईचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने संघाला सोडले होते. त्यानंतर रैना यावर्षीचे आयपीएल खेळणार नाही, असे म्हटले गेले होते. पण रैना आता आयपीएल खेळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएल खेळण्यासाठी तो आपला फिटनेस वाढवण्याचे काम करत आहे.

रैनाला संघात परतायचे असेल तर त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल. पण बीसीसीआयला अजूनही रैनाने संघ का सोडला, हे कारण माहिती नाही. रैनाने जर कौटुंबिक कारणांसाठी जर संघाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले तर त्याचे हे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कदाचित त्याला हे कारण सांगितल्यावर संघात स्थान मिळू शकते.

वाचा-

जर रैनाचे चेन्नईच्या संघात असताना कर्णधार धोनीबरोबर भांडण झाले आणि त्याने संघ सोडला असेल तर त्यावर बीसीसीआय काही करू शकणार नाही. कारण दोन खेळाडूंमधील भांडण हे संघातील अंतर्गत आहे. त्यामुळे बीसीसीआय यावर काहीच बोलू शकणार नाही. रैनाने जर संघातील सदस्य करोना पॉझिटीव्ह सापडल्यामुळे जर युएई सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यावर बीसीसीआय चौकशी करू शकते. त्यानंतर बीसीसीआय आपला निर्णय घेऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा बीसीसीआय रैनाची चौकशी करणार आहे. आयपीएल सोडण्याचा तडकाफडकी निर्णय त्याने का घेतला, याचे उत्तर रैनाला बीसीसीआयला द्यावे लागेल, जर हे उत्तर बीसीसीआयच्या पचनी पडले तरच त्याला यावर्षी आयपीएल खेळता येईल अन्यथा त्याला यावर्षी आयपीएल खेळता येणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here