वाचा-
पुढच्याच महिन्यात प्रवीण हा ४९ वर्षांचा होणार आहे. पण त्याचा फिटनेस २० वर्षांच्या मुलांनाही लाजवेल असाच आहे. ही गोष्ट त्याने सिद्ध करूनही दाखवली आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये प्रवीणने यापूर्वीही एकदा हवेत उडी मारून भन्नाट कॅच पकडली होती. पण त्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा प्रवीणने सुपर कॅच पकडल्याचे पाहायला मिळाले आहे.
कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये प्रवीण हा त्रिनबागो नाइट रायडर्स या संघाकडून खेळतो. त्रिनबागो नाइट रायडर्स आणि सेंट किंट्स अँड नेव्हिस पॅट्रीऑट्स या संघामध्ये एक सामना नुकताच झाला. या सामन्यात प्रवीणने अप्रतिम झेल पकडल्याचे पाहायला मिळाले.
वाचा-
सेंट किट्सचा संघ फलंदाजी करत असताना सातव्या षटकात ही गोष्ट घडली. फवाद अहमदच्या गोलंदाजीवर डंकने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेवर लागला. त्यामुळे चेंडू हवेत उडाला. यावेळी प्रवीण धावत या चेंडूच्या दिशेने आला आणि त्याने हवेत उडी मारत ही कॅच पकडल्याचे पाहायला मिळाले.
प्रवीणच्या या कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडचा माजी गोलंदाज आणि समालोचक डॅनी मॉरीसनने हा व्हिडीओ पाहिला असून त्याने प्रवीणचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर वय हा फक्त एक आकडा असल्याचेही त्याने हा व्हिडीओ पाहिल्यावर म्हटले आहे. प्रवीणने २०१३ साली आयपीएलमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणारा प्रवीण हा भारताचा पहिला क्रिकेटपटू आहे. कारण आतापर्यंत एकही क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळलेला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times