वाचा-
यावर्षी आयपीएलला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच काही विघ्नं आयपीएलच्या मार्गात येऊन गेली आहे. पण अजूनही आयपीएलपुढील समस्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता राजस्थानच्या संघातील एक दिग्गज खेळाडूही काही सामन्यांना मुकणार असल्याचे समजते आहे.
वाचा-
राजस्थानने २०१८ साली तब्बल १२.५ कोटी रुपये खर्च करून बेन स्टोक्सला आपल्या संघात सामील करून घेतले होते. इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा स्टोक्सने उचलला होता. पण तो कौटुंबिक कारणास्तव आता न्यूझीलंडला गेला आहे. त्यामुळे तो इंग्लंडचे सामनेही खेळू शकत नाही. त्याचबरोबर आयपीएलच्या सामन्यांनानाही तो आता मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्टोक्सच्या ब्रेन कॅन्सर झाला आहे आणि ते न्यूझीलंडमध्ये राहत आहेत. हे जेव्हा स्टोक्सला समजले तेव्हा त्याने न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना संपल्यावर स्टोक्सने आपण वडिलांची काळजी घ्यायला न्यूझीलंडला जाणार असल्याचे सांगितले होते.
वाचा-
सूत्रांनी याबाबत सांगितले की, ” न्यूझीलंडमध्ये कोणतीही व्यक्ती बाहेरच्या देशातून आली की त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागते. त्यामुळे स्टोक्स गेले काही दिवस क्वारंटाइनमध्ये होता. पण आता हा कालावधी संपला असून तो आपल्या वडिलांना भेटला आहे. आपल्या वडिलांबरोबर त्याला काही काळ व्यतित करायचा आहे. त्यामुळे स्टोक्सला आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. पण स्टोक्सने जर जास्त काळ वडिलांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला तर त्याला संपूर्ण आयपीएल खेळता येणार नाही. याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा स्टोक्सचा असेल. कारण कौटुंबिक जबाबदारी प्रथम असते. त्यामुळे राजस्थानच्या संघानेही अजून त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. स्टोक्सला जेव्हा आयपीएल खेळायचे असेल त्यानुसार तो संघाला माहिती देईल.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times