क्रिकेटमध्ये सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंग आता ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टी-२० स्पर्धा खेळण्याचा विचार करत आहे. युवराजचा मॅनेजर जेसन वॉनने यासंदर्भात संकेत दिले आहेत. युवीच्या बिग बॅशमधील प्रवेशा संदर्भात चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा सकारात्मक झाली तर तो या स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल.
वाचा-
या वर्षी बीबीएलचा दहवा हंगाम ३ डिसेंबर २०२० ते ६ फेब्रुवारी २०२१ या काळात होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोणताही भारतीय खेळाडू खेळला नाही. भारतीय खेळाडू विदेशातील लीग स्पर्धेत न खेळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बीसीसीआय त्यांच्या खेळाडूंना एनओसी देत नाही. जोपर्यंत भारतीय खेळाडू भारतीय टीम आणि आयपीएलमधून निवृत्त होत नाहीत तोपर्यंत बीसीसीआयकडून एनओसी दिली जात नाही.
वाचा-
३८ वर्षीय युवराज सिंगचे मॅनेजर वॉर्नने द ऐज ला सांगितले की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताचा स्टार युवराज सिंगला टी-२० स्पर्धेत सहभागी करून घेण्यास उत्सुक आहे. या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलिया सोबत चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना युवराज सिंगने सांगितले होते की तो यापुढे टी-२० आणि टी-१० स्पर्धेत भाग घेईल.
वाचा-
२००७च्या टी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या वर्ल्ड कप विजयात युवराजचा महत्त्वाचा वाटा होता. टीम इंडिया आणि आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर युवराज कॅनडाच्या ग्लोबल टी-२० लीग आणि आबू धाबी टी-२० लीग स्पर्धेत खेळला आहे. त्यानंतर तो कॅरेबियन प्रीमीअर लीग स्पर्धेत खेळण्याची शक्यता होती. पण करोनामुळे ते शक्य झाले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times