वाचा-
गेल्या तीन हंगामात आरसीबीच्या संघाला एकदाही बाद फेरीत पोहोचता आले नव्हते. पण यावर्षी आरसीबी कमाल करेल, असे कोहलीला वाटत आहे. कारण यावर्षी संघात काही बदल झाले आहेत. त्याचबरोबर आपल्याला यावेळी जेतेपद पटकावण्याचा दृढ विश्वास आहे, असेही कोहलीने सांगितले आहे.
वाचा-
एका मुलाखतीमध्ये कोहलीने सांगितले की, ” या हंगामात सर्वात चांगले वातावरण माझ्यासाठी आहे. कारण या हंगामामध्ये मला २०१६च्या मोसमाची आठवण येत आहे आणि त्या मोसमासारखीच माझ्याकडून कामगिरी होईल, असे मला वाटत आहे. त्यामुळे हा हंगाम आरसीबीच्या संघासाठी खास असणार आहे.” कोहली २०१६च्या मोसमात भन्नाट फॉर्मात होता. कारण या मोसमात कोहलीने तब्बल चार शतके लगावली होती. कोहलीने या मोसमात धावांची टांकसाळ उघडली होती. या मोसमासारखीस भन्नाट कामगिरी आपण या हंगामात करणार असल्याचा विशअवास कोहली आहे. त्यामुळेच यावर्षी आपला संघ जेतेपद जिंकेल, असे कोहलीला वाटत आहे.
वाचा-
कोहली पुढे म्हणाला की, ” यावर्षी संघ चांगलाच समतोल पाहायला मिळत आहे. यापूर्वी जे काही घडलं ते आन्ही डोक्यातून काढून टाकलं आहे. यावेळी फक्त जेतेपद पटकावण्याचा विचार आम्ही करत आहोत. संघाच चांगले गुणवान खेळाडू आहेत. त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. त्यामुळे यावर्षी आमच्याकडून चाहत्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या नक्कीच आम्ही पूर्ण करू शकतो, असा मला विश्वास आहे. त्यामुळे हा हंगाम आमच्यासाठी वेगळाच असेल.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times