CPL स्पर्धेतील लूसियाने गयाना अमेझन वॉरियर्सविरुद्ध ९३ चेंडू राखून विजय मिळवला. टी-२० लीग स्पर्धेच्या इतिहासात ९३ चेंडू राखून मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी हा विक्रम आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर होता. त्यांनी २००८ साली कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ६८ धावांचे लक्ष्य ८७ चेंडू राखून विजय मिळवला होता. लूसिया संघाने फक्त ४.३ षटकात म्हणजे २७ चेंडूत विजय मिळवला.
वाचा-
स्पर्धेतील दुसर्या सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत गयाना संघ फक्त ५५ धावांवर बाद झाला. या कामगिरीसह गयाना संघाने एक नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला. टी-२० स्पर्धेतील नॉकआउट फेरीतील हा दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेतील प्रो २० सीरिजमधील इगल्स संघाने ४७ धावा केल्या होत्या.
वाचा-
त्रिनिदाद येथे झालेल्या सामन्यातील विजयासह लूसिया संघाने प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गयाना संघाकडून चंद्रपॉल हेमराजने सर्वाधिक २५ धावा केल्या. अन्य फलंदाजांना ११ पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. त्यांचा पूर्ण संघ १३.४ षटकात बाद झाला. फक्त ५६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या लूसिया संघाने १० विकेटनी विजय मिळवला. रहकीम कॉर्नवालने १७ चेंडूत नाबाद ३२ तर देयालने १० चेंडूत नाबाद १९ धावा केल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times