वाचा-
पंतच्या कामगिरीत घसरण का झाली याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख यांनी केला. पंतने धोनीशी तुलना केली. पंत हा धोनीला आदर्श धोनीशी तुलना करत नव्हता तर तो त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच त्याची कामगिरी घसरत गेली.
वाचा-
भारताचे माजी विकेटकीपर आणि माजी निवड समितीचे प्रमुख प्रसाद यांनी स्पोर्ट्सक्रीडाच्या फेसबुक पेजवरील मुलाखतीत ही गोष्ट सांगितली. धोनीच्या निवृत्तीच्या आधी जेव्हा संघ जेव्हा एक विकेटकीपर शोधत होता, तेव्हा त्यासाठी पंत हा सर्वोत्तम पर्याय मानला गेला.
धोनीने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. याचा अर्थ आता भारतीय संघात विकेटकीपरसाठीच्या जागेवर ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात स्पर्धा आहे. पंतने जेव्हा २०१८ साली इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. तेव्हा त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा ते पहिला भारतीय विकेटकीपर होता. त्याची ही कामगिरी तो चांगला खेळाडू असल्याचे दाखवून देते. पण त्यांतर त्याने धोनीशी तुलना करण्यास सुरुवात केली.
वाचा-
मी पंतला समजावले होते की त्याने धोनीशी तुलना करू नये. धोनी एक वेगळा खेळाडू आहे आणि तू एक वेगळा खेळाडू आहेस, असे प्रसाद यांनी मुलाखतीत सांगितले. जेव्हा पंतला पाहिले जायचे तेव्हा त्याची तुलना धोनी सोबत केली जायची. या गोष्टीत पंत देखील अडकला. या गोष्टीतून बाहेर पडण्याबाबत आम्ही त्याच्याशी अनेक वेळा चर्चा केली होती.
धोनीच्या सावलीतून बाहेर पडण्याची गरज आहे. ते एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याला सिद्ध करून दाखवण्याची गरज आहे. स्वत:च्या खेळावर फोकस केल्यास आणि धोनीने जे केले तर पुन्हा करण्याचा प्रयत्न न केल्यास तो नक्की यशस्वी होईल असे प्रसाद म्हणाले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times