भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांना बीसीसीआयने आपल्या कमेंट्री पॅनलमधून हटवले होते. विशेष म्हणजे यासंदर्भात संजय मांजरेकर यांनी पत्र लिहून माफी मागितली होती. पण त्यानंतरही बीसीसीआयने त्यांना आयपीएलसाठी समालोचन करण्यासाठी घेतलेले नाही. त्यामुळे आता त्यांना मदत करायला मुंबई क्रिकेट संघटना पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे.

बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठीच्या समालोचक अर्थात कमेंट्री पॅनलची घोषणा केली. यात बीसीसीआयने सात भारतीय व्यक्तींना स्थान दिले आहे. पण त्याच संजय मांजरेकर यांचा समावेश नाही. विशेष म्हणजे ते २००८ पासून आयपीएलमध्ये समालोचन करत आहेत.

मांजरेकर यांना कमेंट्री पॅनलमध्ये पुन्हा स्थान द्यावे, यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संजय मांजरेकर यांना आपल्या कमेंट्री पॅनलमध्ये स्थान द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबत मुंबई क्रिकेट संघटनेमधीळ नदीम मेमन म्हणाले की, ” संजय मांजरेकर हे एक चांगले समाचोलक आहेत. मांजरेकर आणि सुनील गावस्कर यांचे समालोचन चाहत्यांना नेहमीच आवडत आले आहे. त्यामुळे मांजरेकर यांना बीसीसीआयने कमेंट्री पॅनलमध्ये पुन्हा स्थान द्यावे, असे पत्र मी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना लिहिले आहे. यावर आता बीसीसीआय काय निर्णय घेते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.”

बीसीसीआयने सुनिल गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोपडा, रोहन गावसकर आणि हर्षा भोगले यांचा कमेंट्री पॅनलमध्ये समावेश आहे. हे सर्व जण १० सप्टेंबर रोजी युएईला रवाना होणार आहेत. या पॅनलला दोन गटात विभागले जाणार आहे. पहिला गट दुबई आणि शारजाह येथे असेल तर दुसरा अबू धाबी येथून समालोचन करेल.

बीसीसीआयने या पॅनलमध्ये मांजरेकरांना स्थान दिले नाही. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या एका वादानंतर मांजरेकर चर्चेत आले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना कमेंट्री पॅनलमधून हटवले होते. त्यानंतर संजय मांजरेकर यांनी पत्र लिहून माफी मागितली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here