गीताने याबाबत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. गीताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. गीताच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट्ही आल्या आहेत. काही जणांमी गीताला ट्रोल केले आहे तर काही जणांनी गीताची बाजू घेतल्याचेही पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये गीताने लिहिले आहे की, ” ज्याची काठी त्याचीच म्हैस, असेच चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. पण तुम्ही कंगना राणावतचे ऑफिस तोडू शकता, पण तिची हिंमत तोडू शकत नाही.”
कंगनाने उद्धव ठाकरेंना काय सुनावलं, पाहा…‘उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.
मुंबई पालिकेने आज कंगना राणावतच्या कार्यालयातील अतिक्रमणावर आधीच ठरल्यानुसार बुलडोझर चालवला. या कारवाईविरोधात कंगनाने हायकोर्टात धाव घेतली असता ही कारवाई थांबवण्याचा अंतरिम आदेश कोर्टाने दिला. ‘महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी कसे गेले, नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुरेसा अवधी दिला गेला का? असे सवाल हायकोर्टाने पालिकेला विचारले. महापालिकेने याबाबत उद्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देशही कोर्टाने दिले. उद्या दुपारी ३ वाजता कंगनाच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर ही सुनावणी होत आहे. आजच्या सुनावणीनंतर बंगल्यावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईसाठी कोर्टात अर्ज करणार असल्याचे कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितले असून या सगळ्या पार्श्वभूमीवर पालिका स्तरावर तसेच वर्षा निवासस्थानी बैठकसत्र सुरू आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times