चेन्नईच्या संघातील एकूण १४ जणांना करोना झाला होता, त्यामध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन खेळाडूंचाही समावेश होता. यापैकी दीपक आता पूर्णपणे फिट झालेला आहे, पण महाराष्ट्राचा ऋतुराज कधी मैदानात दिसणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

वाचा-

चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील करोना झालेला वेगवान गोलंदाज दीपक चहर हा आता पूर्णपणे फिट झाला आहे. दीपकने सरावही सुरु केला आहे. त्यामुळे आता दीपक मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीमध्येही दिसू शकतो. कारण या पहिल्या लढतीसाठी दीपक सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. दीपक आता फिट झालेला पण महाराष्ट्राचा ऋतुराज कधी फिट होणार, हे ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

करोना झाल्यावर दीपकला १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याची करोना चाचणी निगेटीव्ह आलेली होती. त्याचबरोबर या सर्व गोष्टींमधून दीपक सावरलेला आहे. पण यामधून ऋतुराजला बाहेर पडालया दोन दिवसांचा अवधी लागेल, असे म्हटले जात आहे. कारण अजून ऋतुराजच्या दोन करोना चाचण्या बाकी आहेत.

वाचा-

याबाबत चेन्नईच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी सांगितले की, ” ऋतुराजची प्रकृती चांगली आहे. पण अजूनही त्याच्या दोन करोना चाचण्या बाकी आहेत. या दोन्ही करोना चाचण्या जर त्याच्या निगेटीव्ह आल्या तर त्याला संघासोबत राहण्याची परवानगी देण्यात येईल. आमच्या माहितीनुसार फक्त ऋतुराज हाच सध्या क्वारंटाइनमध्ये आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर हा फिट झाला असून तो संघात परतलेला आहे.”

वाचा-

आता ऋतुराजच्या दोन करोना चाचण्या होणार आहेत. त्यानंतर ऋतुराज संघात परतणार का, हे समजू शकते. या दोन्ही करोना चाचण्यांमध्ये निगेटीव्ह आल्यावर त्याला संघात परतता येईल. १२ सप्टेंबरला ऋतुराज संघात परतणार की नाही, हे समजू शकणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here