दुबई: चा () १३ वा हंगाम आठ दिवसांवर आला आहे. सर्व संघ जोरदार तयारी करत असून स्पर्धेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध असा होणार आहे. हे दोन्ही संघ गतविजेते आणि गत उपविजेते आहेत.

या दोन्ही संघांच्या सराव सत्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. त्यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन्ही संघातील सर्वात जास्त लक्ष्य असलेले खेळाडू म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी होय.

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा सराव सत्रा दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रोहितने मारलेला षटकार मैदानाबाहेर गेला आणि तो रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसला लागला. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण यावेळी खेळाडू आहे चेन्नईचा कर्णधार होय.

चेन्नई सुपर किंग्ज संघच्या संघात करोना रुग्ण आढळले आणि त्यानंतर सुरेश रैना आणि हरभज सिंग या दोन खेळाडूंनी माघार घेतली त्यामुळे धक्के बसले होते. त्यांनी अन्य संघांच्या तुलनेत उशिरा सराव सुरू केला. असे असेल तरी धोनीने पहिला सामना पुढे ढकलला नाही.

चेन्नई संघ दिवस रात्री सराव करत आहे. चेन्नईच्या सरावातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून या व्हिडिओमध्ये धोनी एक शानदार षटकार मारला. धोनीने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. चेन्नईचे खेळाडू चेंडू शोधण्यास गेले पण त्यांना तो सापडला नाही.

धोनीने जेव्हा षटकार मारला तेव्हा सीमारेषेवर मुरली विजय फिल्डिंग करत होता. धोनीचा षटकार पाहून तो खाली बसला. बॉल मैदानापासून इतक्या लांब गेला की, तो म्हणाला, बॉल गायब झाला. ही पॉवर नाही तर परफेक्ट टायमिंग आहे. यात गोलंदाज देखील काही करू शकत नाही.

आयपीएलचे आतापर्यंत तीन वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नईचा संघ यावेळी देखील विजेतेपदाचा दावेदार आहे. चेन्नईने २०१०, २०१११ आणि २०१८ साली विजेतेपद मिळवले होते. तर मुंबई संघाने सर्वाधिक चार वेळा विजय मिळवला आहे गेल्या वर्षी २०१९ मध्ये चेन्नईचा फक्त एक धावाने पराभव केला होता. मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी विजेतेपद मिळवली आहेत.

चेन्नईने अद्याप रैना आणि हरभजन यांच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली नाही. रैना पुन्हा परत येऊ शकतो असे बोलले जात आहे. पण त्याबद्दल अद्याप संघाकडून काहीच सांगितले गेले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here