संघात स्थान मिळवण्यासाठी दोन युवा खेळाडू सराव करत होते. त्यावेळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे या क्रिकेटपटूंनी क्रिकेटचा सराव थांबवला आणि त्यांनी फुटबॉलचा सराव करायला सुरुवात केली. क्रिकेटपटू आपला फिटनेस वाढवण्यासाठी फुटबॉलचा सराव करत असल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे. हे युवा खेळाडू पावसात फुटबॉलचा सराव करत होते. त्यावेळी त्यांच्यावर आकाशातून वीज पडली.
वाचा-
ही सर्व गोष्ट एवढी अचानक घडली की तिथे उपस्थित खेळाडूंनाही लगेच काही समजले नाही. पण तीन खेळाडू मैदानात पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे या खेळाडूंनी मैदानात धाव घेतली आणि या तीन खेळाडूंना उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्टिपलमध्ये उपचार सुरु असताना तीनपैकी दोन युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला.
वाचा-
बांगलादेशच्या गाजीपूर स्डेडियममध्ये ही घटना घडली. या स्टेडियममध्ये क्रिकेटचा सराव सुरु होता. त्यावेळी पाऊसाचे आगमन झाले. त्यामुळे मोहम्मद नदीन आणि मिजानपूर या दोघांनी फुटबॉलचा सराव करायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच मैदानात त्यांच्यावर वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही खेळाडू संघात स्थान मिळवण्यासाठी सराव करत होते. पण अखेर त्यांच्यावर काळाने असा घाला केला.
वाचा-
यावेळी या प्रकरणाचे साक्षीदार असलेल्या मोहम्मद पलाश यांनी यांनी सांगितले की, ” ही घटना एवढ्या जलद घडली की, सुरुवातीला कोणालाच काही समजले नाही. जेव्हा वीज पडली आणि त्यानंतर मैदानातील तीन मुलं कुठं आहेत, हे पहिल्यांदा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही जेव्हा मैदानात पाहिले तेव्हा हे तिन्ही खेळाडू चिखलात पडललेले होते. या तिघांनाही उचलून आम्ही जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेले. या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनीही या दोघांचा वीज पडून मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times